9049045613 / 8275454424

daclatur@rediffmail.com

दयानंद शिक्षण संस्था संचलित

दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालय, लातूर

UDISE No. 27281201011

विद्यार्थी मित्रहो,
दयानंद कला महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत. मराठवाडा विभागात स्वतंत्रपणे कला शाखेचे शिक्षण देणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात दर्जेदार शिक्षणाचे इ. ११ ते एम.फिल (हिन्दी) पर्यंतचे सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दयानंद कला महाविद्यालयामध्ये प्रवेश म्हणजे विद्यार्थ्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी एक मौलीक संधीच होय. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये
१. अर्हताप्राप्त, तज्ञ, अनुभवी व उच्चविद्या विभूषित प्राध्यापक वर्ग.
२. अत्त्याधुनिक स्वतंत्र इमारत.
३. विविध विषयावरील ग्रंथसंपदा व स्वतंत्र सुसज्ज ग्रंथालय.
४. सर्व विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी मोफत पुस्तकांची सोय.
५. मराठी, हिंदी, पाली, संस्कृत, संगीत, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, भूगोल, संरक्षणशास्त्र आदी विषयांची सोय.
६. अत्यंत सुंदर व निसर्गरम्य परिसर.
७. गुणवंत विद्यार्थ्यांना गोल्ड कार्ड.
८. गोल्ड कार्ड धारक विद्यार्थ्यांना, ग्रंथालयात मुक्त संचार, ग्रंथ संपदेचा वापर करण्याची विशेष सवलत व स्वतंत्र अभ्यासिकेची सोय.
९. अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन वर्गाची सोय.
१०. राष्ट्रीय सेवा योजनेचे दोन युनिट कार्यरत.
११. राष्ट्रीय सेवा योजना, रोव्हर रेंजर, सांस्कृतिक विभाग आणि इतर मंडळाच्या माध्यमातून सुप्त गुणांना वाव देऊन देशाचा एक जबाबदार नागरिक बनविण्याचा प्रयत्न.
१२. बारावी विद्यार्थ्यांच्या अनेक सराव परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली जाते. १३. डिजिटल क्लासरूम च्या माध्यमातून ऑफलाईन व ऑनलाईन अध्यापानाची सोय. १४. महाविद्यालय व महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नियंत्रणात आहे. १५. मुलां-मुलींसाठी स्वतंत्र व सर्व सोयीनीयुक्त वसतिगृह.
१६. उज्ज्वल निकालाची परंपरा, बोर्डाच्या परीक्षेत आतापर्यंत अनेक वेळा राज्य व विभागात प्रथम येणारे गुणवंत विद्यार्थी.
१७. कमवा व शिका योजनेची संधी व लाभ.
१८. विद्यार्थिनींना संपूर्ण संरक्षण.
१९. सुसज्ज भव्य व दिव्य क्रीडांगण, देशी व विदेशी खेळाची सोय, प्रशिक्षीत व पूर्णवेळ प्राध्यापक.
२०. रात्रीच्या अभ्यासिकेची स्वतंत्र सोय.
२१. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा गणवेश मोफत.
२२. शैक्षणिक सहलींचे वेळोवेळी आयोजन
२३. विद्यार्थ्यांचे गुण व अनुपस्थिती एस.एम.एस. द्वारे पालकांना कळविण्याची सोय
२४. विद्यार्थी पालक मेळावा व पालक संवाद बैठकीचे वेळोवेळी नियोजन
२५. सहकारी प्राध्यापकांचे युट्युबवर ई-लर्निंगचे साहित्य.