दयानंद कला महाविद्यालय, लातूर
: सुचना :
अकरावी व बारावी ऑफलाईन प्रवेश
महाविद्यालयातील अकरावी व बारावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
इयत्ता ११ वी शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम सरळ प्रवेश देणे सुरू आहे. अधिक माहितीसाठी http://juniordaclatur.org या संकेतस्थळास भेट द्या.
ऑफलाईन प्रवेशाकरिता पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.
१. शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ मध्ये इ. ११ वी वर्गासाठी ऑफलाईन प्रवेश नोंदणी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या निर्देशानुसार अंतिम प्रवेश दिला जाईल.
२. ऑफलाईन नोंदणी फिस रू.५०/- राहील.
३. महाविद्यालयाच्या संकेतस्थळ (Website) वर प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश व इतर शुल्क भरल्यानंतर ऑफलाईन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचा तात्पुरता प्रवेश निश्चित होईल.
४. आवश्यक मुळ कागदपत्रे प्रत्यक्ष महाविद्यालयात दाखल करून रितसर पावती घ्यावी.
(मूळ कागदपत्रे दाखल केल्याशिवाय अंतिम प्रवेश गृहित धरला जाणार नाही. )
११ वी इंग्रजी माध्यमाची तुकडी विना अनुदानीत तत्त्वावर चालविली जाते.
★ प्रवेश अर्ज कक्ष क्रमांक 6 येथून घ्यावा.
★ प्रवेश अर्जासोबत फोटो, आधार कार्ड मुळ गुणपत्रक, मूळ टीसी, जातीचे प्रमाणपत्र या सोबतच सर्व
प्रमाणपत्रांच्या दोन सत्य प्रति जोडाव्यात.
★ कक्ष क्रमांक 6 मध्ये प्रवेश समिती कडून फॉर्म तपासून घ्यावा. कक्ष क्रमांक 7 वरून फॉर्म तपासून घ्यावा.
★ कक्ष क्रमांक 6 मध्ये शुल्क रू. 1400/- भरून प्रवेश निश्चित करावा.